इतिहास

माहिती
मिरज–पंढरपूर राज्य महामार्गालगतच मिरज तालुक्यातील भोसे गावाची दोनशे वर्षापूर्वी निर्मिती झाली. या गावास सभोवताली निसर्गरम्य अशा निसर्गाची साथ लाभलेली आहे. यामध्ये नव्याने होवू पाहत असलेल्या दंडोबा अभयारण्य यामध्ये दंडोबा, गोदडोबा डोंगराचा विस्र्तीन असा भाग आहे. यात दंडोबा वनविभाग, गोदडोबा व भोसे वनविभाग असे येतात. या वनामध्ये तरस, लांडगे, सायाल, कोल्हे, खोकड, ससे अशी अनेक सस्तन व उभयचर प्राणी आहेत तसेच मोर, घुबड, धार, विविध चिमण्या असे पक्षी देखील आहेत. त्याचप्रमाणे अनेकांच्या घरामधून देशी म्हैसाना जातीच्या म्हैशी तसेच खिल्लर व इतर जातीचे गायी, बैले आहेत. या गावात उस, हळद, द्राक्ष, मका तसेच भाजीपाला पिके घेतली जातात यासाठी विहिरी व बोअरच्या पाण्याचा वापर केला जातो. भोसेचा परिसर हा पर्यटनासाठी उत्तम असून यामध्ये दंडोबा डोंगर यलम्मा देवी पाझर तलाव, श्री यल्लम्मा देवालय, भगवान महावीर मंदिर, भोलरेज वॉटर पार्क अशी ठिकाणी आहेत.

सुविधा
या गावास पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय असल्याने पाण्याच्या टंचाईस जास्त सामोरे जावे लागत नाही. विहिर, कुपनलिकेमाफ‍र्त पाण्याची सोय करण्यात आली आहे. हे गाव मिरज–पंढरपूर राज्य महामार्गालगत असल्याने गावास जोडणारे रस्ते ही चांगले आहेत सोनी, पाटगाव, करोली एम, या गावांना जोडणारे रस्ते आहेत गावासाठी सांगली, मिरज कवठेमहाकाल मधून शहरी व ग्रामीण बससेवा सुरु आहे तसेच इतर वाहनांची संख्या मोठी आहे तसेच तीन प्राथमिक शाळा, तीन आंगणवाडया, दोन हायस्कूल, एक बारावीपर्यतचे कॉलेज आहे. गावामध्ये लोकांना राहण्यासाठी जागा अपुरी असल्याने नागरिक त्या अपु–या जागेत शौचालये बांधत नसल्याने उघडयावर शौचास बसत आहेत याचा येथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यात थोडे ग्रामपंचायतीने शौचालय बांधली आहेत तरी अपुरी पडत आहेत तर पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय अदयापि एकही नाही.
संस्था– सहकारी संस्था– पूर्वभाग सोसायटी, पश्चिम भाग सोसा,
बॅंका– जिल्हा मध्यवर्ती बॅंक, रत्नाकर बॅंक, आष्टा पीपल्स बॅंक,
पतसंस्था– गोमटेस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, वसंतदादा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,
शैक्षणिक संस्था– स्वा. ने.स.चौगुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय,कर्मवीर विदयामंदीर,स्वयंसेवी संस्था–सरस्वती वाचनालय, भावना दूध डेअरी, रोजगार उपलब्धता:– येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. सुशिक्षित बेरोजगाराकडून येथे वेल्डिंग व्यवसाय, पिठाची गिरण, किरणा दुकाने, पानपट्टी, केस कर्तनालय, इलेक्टॉनिक्स, इलेक्ट्रिक विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय, पशुपालन, हॉटेल्स आदी व्यवसाय मोठया प्रमाणावर येथे होत आहे. तसेच येथे पारस डिटर्जंन्ट निर्मितीचा कारखाना आहे. तसेच छोटे व्यवसाय व खाजगी कोचिंग क्लासेस ही घेतले जातात. आकडेमोडी:– भोसे या ठिकाणी तलाठी कार्यालय, राज्य शासनाचा पशुवैदयकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, केंद्र शासनाचे दंडोबा वनविभाग, जि.प. शाळा नं.1,2 , पोस्ट आॅफीस इत्यादीची सरकारी कार्यालये आहेत. या गावचे जमिनीचे क्षेत्र 2769.15 हेक्टर आहे त्यातील लागणीलायक 1603 हेक्टर क्षेत्र आहे. बागायती – 168 हेक्टर, जिरायत–1435 हे. असून गायरान 183 हे. क्षेत्र आहे येथे चांगल्या, मध्यम व खडकाळ अशा तीनही प्रकारच्या जमिनी पहावयास मिळतात. येथे मुख्यत्वे शेती हे प्रमुख उत्पादनाचे साधन असून शेतीपुरक इतर व्यवसाय केले जातात. यामध्ये पशुपालन, गांडूळ खत निर्मिती इ. व्यवसाय आहेत.